शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:18 PM2019-07-30T12:18:51+5:302019-07-30T12:19:07+5:30

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे.

Akola ranked 22 in toilet construction | शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

Next

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आराखडा निश्चित केला आहे. त्यानुसार विविध उपक्रमही राबवले जात आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यासाठी ३,८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी तयार झाली. लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात आले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करणे, रोजगार सेवकासोबत समन्वय ठेवून काम करावे, १० जूनपर्यंत ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही जिल्ह्यातील शौचालयांची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने राज्यात अकोला जिल्हा २२ व्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये १०९४ शौचालयांची निर्मिती करणे शिल्लक आहे. त्यासाठी २९ जुलैपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते; मात्र तीही पूर्ण झाली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २१२ पैकी १४७ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे पूर्ण झाली आहेत. तर ६५ ग्रामपंचायतींना ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली.

उद्दिष्ट अपूर्ण असलेल्या ग्रामपंचायती
तालुका             ग्रामपंचायती             शौचालय
अकोला                 १०                             १५२
अकोट                   २१                             ५७८
बाळापूर                १०                              १०१
बार्शीटाकळी         १४                                 ९८
मूर्तिजापूर              ४                                   ४
पातूर                     ०                                   0
तेल्हारा                 ६                                  १६१

 

Web Title: Akola ranked 22 in toilet construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.