अकोला: चाकूने हल्ला करणार्यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:13 IST2017-12-17T23:12:39+5:302017-12-17T23:13:34+5:30

अकोला: चाकूने हल्ला करणार्यास पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातीलच गोडबोले प्लॉटमध्ये दोन इसमांनी एकमेकांना चाकू भोसकल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर यातील एका आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. उमरीतील रहिवासी बाळकृष्ण मुरलीधर गायकवाड व गोडबोले प्लॉटमधील रहिवासी राजू वासुदेव भटकर या दोघांमध्ये शनिवारी दुपारी गोडबोले प्लॉटमधील गोडबोले उद्यान या ठिकाणी वाद झाला. दोघांमधील वाद वाढल्यानंतर दोघांनीही धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढविला. दोघांच्याही शरीरावर शस्त्रांनी हल्ला झाल्याने यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना डाबकी रोड पोलिसांनी सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या दोघांच्याही शरीरातील रक्त घटनास्थळावर मोठय़ा प्रमाणात सांडलेले असल्याने नागरिकांनी त्यावर पाणी फेकले. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी दोघांनीही परस्परांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.