अकोला भविष्य निर्वाह निधी कार्यालय देशात ‘नंबर वन’!
By Admin | Updated: August 28, 2014 02:20 IST2014-08-28T02:09:51+5:302014-08-28T02:20:24+5:30
देशातील १२0 कार्यालयामधून अकोल्याला मिळाला उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार

अकोला भविष्य निर्वाह निधी कार्यालय देशात ‘नंबर वन’!
अकोला - देशातील १२0 भविष्य निर्वाह निधी कार्यालयामधून अकोला भविष्य निर्वाह निधी कार्यालय ह्यनंबर वनह्ण असल्याचा पुरस्कार केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने २६ ऑगस्ट रोजी दिला. भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा निपटारा एका दिवसात करणे तसेच नवृत्ती वेतनातील त्रुट्यांचे प्रमाण २४ टक्क्यावरून ६ टक्क्यावर आणून पेंशनर्सच्या खात्यात दर महिन्याच्या एक तारखेला रक्कम जमा करण्याची सेवा या कार्यालयाने तत्पर दिली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने अकोला कार्यालयाला हा उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार दिला आहे.
अकोला विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त मनोज कुमार यांनी कार्यालयामधील विविध कामांमध्ये सुसूत्रता आणली. कर्मचार्यांना पेंशन, त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम तत्काळ खात्यात जमा करण्यासाठी विशेष योजना राबविली. यामध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ या आर्थिक वर्षात १0 हजार ४९२ अर्ज भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी आले होते. यापैकी या कार्यालयाने ९ हजार ७७६ प्रकरणांचा निपटारा केला असून, ७१६ प्रकरणे खारीज केली आहेत. आयुक्त मनोज कुमार या कार्यालयामध्ये रुजू झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत होता. मात्र त्यांनी या कामामध्ये सुधारणा करून भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी आलेला अर्ज एकाच दिवसात निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेमुळे गत एक वर्षाच्या काळात १0 हजारांपैकी ९ हजारांवर प्रकरणांचा निपटारा करण्यात त्यांना यश आले आहे. यासोबतच ७७ हजार ९४0 कर्मचार्यांपैकी ६९ हजार ७७ कर्मचार्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कार्यालयाने केलेले कामकाज उत्कृष्ट असून, देशातील इतर कार्यालयांसाठी प्रेरणादायी असल्याचे केंद्रीय श्रम व रोजगार कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर देशातील १२0 कार्यालयामधील कामकाजाची पडताळणी केल्यानंतर अकोला भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा निपटारा एका दिवसात करण्यात येत असून, आता ही प्रक्रिया काही तासांची करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी कार्यालयातील कर्मचार्यांसह सर्वांंचेच सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यालयाला देशातून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. कर्मचार्यांना त्यांच्या श्रमाचे पैसे काही तासातच देण्यासाठी एक योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त मनोज कुमार यांनी सांगीतले.