अकोला : पातूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:12 IST2018-01-29T20:38:38+5:302018-01-30T01:12:49+5:30
पातूर (अकोला): पातुरातील नानासाहेब नगरात राहणार्या सागर शालीग्राम जगताप या ३0 वर्षीय अविवाहित युवकाने पातूर-वाशिम रोडवरील निरंजन महादेव कढोणे यांच्या शेत सर्व्हे नं. २३८/२ मधील झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली.

अकोला : पातूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्या करणार्या युवकाचे नाव - सागर शालीग्राम जगताप झाडाला गळफास घेऊन संपविली जीवनयात्राआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर (अकोला): पातुरातील नानासाहेब नगरात राहणार्या सागर शालीग्राम जगताप या ३0 वर्षीय अविवाहित युवकाने पातूर-वाशिम रोडवरील निरंजन महादेव कढोणे यांच्या शेत सर्व्हे नं. २३८/२ मधील झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. या घटनेप्रकरणी पातूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतास एक मोठा भाऊ व एक बहीण आहे. वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.