अकोला शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सराईत गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:37 IST2018-01-01T13:35:47+5:302018-01-01T13:37:46+5:30
अकोला: शहरातील अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय नगर भागातील इसमाची सोमवारी पहाटे भौरद रोडवरील निर्माणाधिण उड्डाणपुलावर हत्या करण्यात आली.
_201707279.jpg)
अकोला शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सराईत गुन्हेगाराची हत्या
अकोला: शहरातील अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय नगर भागातील इसमाची सोमवारी पहाटे भौरद रोडवरील निर्माणाधिण उड्डाणपुलावर हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नायगाव परिसरातील रेल्वे गेटजवळ आणून टाकण्यात आला. हत्येची घटना उघड झाल्यावर गुंडांनी पोलिसांना नवं वषार्ची सलामी दिल्याचे वास्तव आहे.
कुख्यात गुन्हेगार इल्लू उर्फ इलियास हसन पटेल (३०, रा. संजय नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. इल्लू याला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता, नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्याने पत्नी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या २ मुलीचा ताबा मागितला. या कारणावरून सासरकडील मंडळी सोबत त्याचा वाद झाला. याच कारणावरून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर त्याची हत्या झाली असल्याचा अंदाज पोलीसानी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील पाच जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार शैलेश सपकाळ, संजीव राऊत सह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.