शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

अकोला मनपाने गाठला ४१ टक्के कर वसुलीचा आकडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 3:29 PM

महापालिकेने २९ मार्च रोजी एक दिवसात एक कोटीची वसुली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अकोला: अकोला महापालिकेने मालमत्ता कर वसुलीचा ४१ टक्क्यांचा आकडा अखेर कसाबसा गाठला. ५९ टक्के कर वसुली अजूनही शिल्लक राहिली असून, एका दिवसात पन्नास लाखांच्यावर आकडेवारी जाण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणेला आता मालमत्ता कर वसुलीवर भर देणे गरजेचे झाले आहे. महापालिकेने २९ मार्च रोजी एक दिवसात एक कोटीची वसुली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शास्ती माफीसाठी रविवार, ३१ मार्च हा शेवटचा दिवस ठेवला असून, अकोलेकरांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ६ मार्च २०१९ पर्यंत ३५.६७ टक्क्यांपर्यंतची कर वसुलीची मजल गाठली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या चरणातदेखील झपाट्याने आकडेवारी पुढे सरकली नसल्याने मनपा आयुक्तांनी अनेक बैठका घेतल्यात; मात्र थकीत आकडेवारीतील वसुली पन्नास टक्क्यांपर्यंतही पोहोचली नाही. महापालिका कर वसुलीचा आकडा आता ४१ टक्क्यांवर स्थिर झाला असून, त्यापलीकडे जाण्याची शक्यता जवळ-जवळ मावळली आहे. महापालिकेला मागील आणि चालू असे एकूण १०३७७२५३०५ रुपये घेणे होते. यापैकी बरीचशी वसुली महापालिकेच्या कर विभागाने वसूल केली; मात्र अजूनही ५९ टक्के वसुली करायची बाकी आहे. अकोला महापालिकेच्या चार झोननिहाय आकडेवारीनुसार हिशेब लावल्यास अकोला पूर्वची वसुली टक्केवारी सर्वात जास्त आहे. पूर्व झोनने पन्नास टक्क्यांचा आकडा पार केला. इतर झोनच्या प्रमुखांना तशी वसुली करता आलेली नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका