शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:02 IST

सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत तयार केलेला ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे.

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी ‘टीडीआर’(हस्तांतरणीय विकास हक्क) देऊन जमीन घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा पद्धतशीररीत्या वापर रेल्वे प्रशासनाच्या जागेवरील अतिक्रमकांना हुसकावल्यानंतर त्यांना नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला पर्यायी जागा देण्यासाठी केला जात आहे. नायगाव परिसरातील कवडीमोल किमतीच्या जमिनीला सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत तयार केलेला ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे.अकोट फैल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या जागेवर अतिक्रमकांनी घरे उभारली. या जागेवरील अतिक्रमण दूर करण्याच्या उद्देशातून वर्षभरापूर्वी रेल्वे प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या होत्या. यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडेही बैठकी पार पडल्या होत्या. रेल्वे प्रशासनाच्या जागेवरील अतिक्रमकांना हुसकावल्यानंतर त्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची आहे. असे असले तरी मनपा क्षेत्रात राबविल्या जाणाºया पंतप्रधान आवास योजनेंतर्गत संबंधित अतिक्रमकांना घरे उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. अर्थातच, सुमारे २२६ च्या आसपास असणाºया अतिक्रमकांना घरे बांधून देण्यासाठी मनपा प्रशासनाने पर्यायी जागेचा प्रस्ताव तयार करणे भाग असताना या ठिकाणी कवडीमोल किमतीच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपमधून प्रस्ताव दिला जात असल्याचे चित्र आहे....तरीही कलम ३७ (२) अन्वये कार्यवाहीनायगाव येथील प्रस्तावित पर्यायी जागेचे क्षेत्रफळ किती, याचा प्रस्तावात उल्लेख नाही. दरम्यान, सभागृहात काँग्रेस पक्षासह खुद्द भाजप नगरसेवकांनी या प्रस्तावातील कलम ३७ (२)नुसार कार्यवाही प्रस्तावित न करण्याचा मुद्दा पोटतिडकीने मांडला होता. तरीही महापौरांनी दिलेल्या ठरावात कलम ३७ (२)चा समावेश करूनच ‘टीडीआर’ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असा उल्लेख आहे, हे येथे उल्लेखनीय.अवघ्या २४ तासांत ठराव का?

मनपात ९ डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमकांना घरे बांधून देण्यासाठी सर्व्हे क्र. ४२ मौजे नायगाव येथील जागेचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीनंतर शहरात विविध ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध असताना डम्पिंग ग्राउंड परिसरातील ‘त्या’च खासगी जागेचा अट्टहास का, असा सवाल उपस्थित होत असतानाच महापौर अर्चना मसने यांनी १० डिसेंबर रोजी सभागृहाने नाकारलेला ठराव प्रशासनाकडे सादर केला. प्रशासनानेसुद्धा विनाविलंब हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. नेमका हाच ठराव २४ तासांत तयार झाल्याने शंकेचे ढग दाटून आले आहेत.मोघम ठरावाचा फायदा?सभागृहात प्रशासनाच्यावतीने आयुक्त संजय कापडणीस यांनी पर्यायी जागेचा विचार करता येईल, असे नमूद केले होते. दुसरीकडे ठरावात मनपाकडे इतर कोणतीही पर्यायी जागा मनपाकडे उपलब्ध नसल्याने महसूल किंवा रेल्वे विभागाने पर्यायी जागा सुचविल्यास त्यावर अतिक्रमकांना घरे बांधून देता येतील, असा उल्लेख आहे. अर्थात, अशा मोघम ठरावाचा फायदा नायगावात जमीन खरेदी केलेल्या मालमत्ताधारकांना होईल, असे दिसून येत आहे.

जमिनीचे भाव चारपट वाढतील!‘टीडीआर’च्या निकषानुसार प्रशासनाने खासगी जागा घेतल्यास मालमत्ताधारकाला दुप्पट मोबदला द्यावा लागतो. त्यासाठी संबंधित जागेवर आरक्षणाची तरतूद करावी लागेल. भविष्यात कधीही आरक्षण हटवून जागेच्या मोबदल्यात ‘टीडीआर’ घेतल्यास त्याचे दर चारपट वाढतील. साहजिकच, डम्पिंग ग्राउंडलगतच्या कवडीमोल जमिनीला सोन्याचा भाव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका