अकोला : मोर्णा नदीला पूर; आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:11 IST2024-07-08T16:11:12+5:302024-07-08T16:11:28+5:30
रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्णा नदीला पूर आला.

अकोला : मोर्णा नदीला पूर; आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प
अमित पाटील
नवथळ ( जि. अकोला) : मागील काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, रविवार, दि. ७ जुलै दुपारीनंतर पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळीसुद्धा पाऊस सुरू होता. या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून, मोर्णा नदीला पूर आला. पुराचे पाणी उगवा येथील पुलावरून वाहत असल्याने आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
यावर्षी पावसाळ्यात जून उलटला तरी दमदार पाऊस बरसला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती. रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्णा नदीला पूर आला. उगवा येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली. त्यामुळे सकाळी कामाकरिता जाणारे कर्मचारी, शाळकरी मुले व इतरही अनेक प्रवाशांना आल्या पावली परतावे लागले.