शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अकोला : दोन लाचखोर पीएसआयसह वकील गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:21 AM

अकोला :  मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्‍विनी गायकवाड, पुरुष उपनिरीक्षक गणेश कोथळकर व मध्यस्थी करणारा विधिज्ञ सचिन वानखडे हे तिघेजण अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकले. 

ठळक मुद्देमूर्तिजापूर पोलीस ठाण्याचे पितळ उघडलाचखोरी प्रचंड फोफावली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्‍विनी गायकवाड, पुरुष उपनिरीक्षक गणेश कोथळकर व मध्यस्थी करणारा विधिज्ञ सचिन वानखडे हे तिघेजण अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकले. मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण संस्थाचालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात २ जानेवारी रोजी सदर युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण दडवून ठेवले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या बलात्कार प्रकरणाचा तपास पीएसआय अश्‍विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर यांच्याकडे असताना त्यांनी आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच आरोपीला लाभ मिळेल, या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी अँड. सचिन वानखडे याच्या माध्यमातून २0 जानेवारी रोजी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २३ जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर २५ जानेवारी रोजी पुन्हा पडताळणी केली असता यामध्ये तीनही आरोपींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सोमवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी मूर्तिजापूर गाठून आरोपी अश्‍विनी गायकवाड, गणेश कोथळकर व अँड. सचिन वानखडे या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटला असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवरही या प्रकारामुळे संशयाची सुई निर्माण होत असल्याची माहिती आहे.

अधिकारी-विधिज्ञांची मिलीभगततक्रारकर्ता तयार करणे तसेच ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, त्याला घाबरून देत प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जिल्हय़ातील काहीविधिज्ञ कुप्रसिद्ध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही विधिज्ञांनी अशाप्रकारे दलालीचेच काम सुरू केल्याचे मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरPolice Stationपोलीस ठाणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग