लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.लहान उमरीमध्ये राहणार्या ४0 वर्षीय मावशीकडे त्यांच्या बहिनीची मुलगी लहानपणापासून रहिवासी आहे. या अल्पवयीन मुलीचे शिक्षण मावशीकडेच सुरू असून, येथेच ती लहानाची मोठी झाली. रविवारी जवळच असलेल्या किराणा दुकानात वस्तू आणण्यासाठी गेली मात्र परत आलीच नाही. दुकानात गेलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी न परतल्याने तिची मावशी व काकाने शोध घेतला; मात्र तिचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला : लहान उमरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:43 IST
अकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
अकोला : लहान उमरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण
ठळक मुद्देलहानपणापासून मावशीकडे रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरणसिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला