Akola: उसने एक लाख दिले, मागितले तर मित्राने चाेपले!

By नितिन गव्हाळे | Updated: August 19, 2023 22:39 IST2023-08-19T22:38:37+5:302023-08-19T22:39:06+5:30

Akola: जिम ट्रेनर मित्राने ओळखीतील एका मित्राला तीन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. त्याला पैशांची मागणी केली तर त्याने घरी बोलावून काठ्यांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Akola: He gave one lakh, if he asked for it, the friend took it! | Akola: उसने एक लाख दिले, मागितले तर मित्राने चाेपले!

Akola: उसने एक लाख दिले, मागितले तर मित्राने चाेपले!

- नितीन गव्हाळे
अकोला - जिम ट्रेनर मित्राने ओळखीतील एका मित्राला तीन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. त्याला पैशांची मागणी केली तर त्याने घरी बोलावून काठ्यांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोठी उमरी येथे राहणारे आनंद गजानन खंडारे (३०) यांच्या तक्रारीनुसार ते जिम ट्रेनर असून, त्यांनी ओळखीतील मित्र संतोष रामराव सुलताने, रा. खडकी याला २०१९ मध्ये घर बांधकामासाठी एक लाख रुपये दिले होते. एक वर्षापासून त्याच्याकडे पैशांची मागणी करूनही तो टाळाटाळ करीत आहे. १४ ऑगस्ट रोजी दुपारी संतोष सुलताने भेटला असता, त्याला आनंद खंडारे यांनी पैशांची मागणी केली. परंतु त्यांना पैसे घेण्यासाठी संतोष सुलताने याने घरी बोलावले. १५ ऑगस्ट रोजी सकाळी आनंद खंडारे हे खडकी येथे सुलताने याच्या घरी गेले असता, त्यांना पैसे दिले नाहीच, उलट संतोष सुलताने, आकाश वाघमारे व त्याचा काका विलास वाघमारे यांनी काठीने मारहाण करून घरातून हाकलून दिले. या प्रकरणात खदान पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Akola: He gave one lakh, if he asked for it, the friend took it!