शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अकोला : महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:26 IST

अकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी सोमवारी दुपारी येथील स्वराज भवनात सामूहिक मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देअधिवेशनावर जनआक्रोश मोर्चासाठी रवाना प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी सोमवारी दुपारी येथील स्वराज भवनात सामूहिक मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर सुरक्षा रक्षक कपातीचे परिपत्रक रद्द होण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्यात येत असून, त्या मोर्चामध्ये राज्यभरातून सुमारे ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून सरकारचा व महावितरणच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत. या असंघटित कामगार सेल मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष  मो. बदरुज्जमा हे करणार असून,आपल्या मागण्यांचे निवेदन  मुख्यमंत्री व   ऊर्जामंत्री यांना देतील. हे सुरक्षा रक्षक नागपूर येथील आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार असून,  या मोर्चाला इंटक अकोला झोनचे अध्यक्ष बी. के. मनवर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सोमवारी स्वराज भवन येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, अविनाश देशमुख, राजेश भारती, कपील रावदेव, अनंत बगाडे यांच्या उपस्थितीत आयोजित निषेध आंदोलनात सचिन ढोणे, प्रकाश महल्ले, अरविंद खंडारे, बाबूराव पवार, राजेश वावघे, श्रीराम इंगळे, नागो ताले, संजय काकडे, रामभाऊ बंड, विनोद जायभाये, अमोल नगरे, पुरुषोत्तम बायस्कार, अक्षय बागडे, गजेंद्र कळमकार, मंगेश काटोले, अनिल साबळे, रामकृष्ण नाठे, मो. इद्रिस, गजानन बोचे, जितेंद्र घन, गोपाल नेमाडे आदी सुरक्षा रक्षकांनी सहभाग नोंदविला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मोर्चाकरिता संघटनेचे जिल्हा संघटक अशोक अबगड, राहुल वाघ, अकोट तालुका संघटक गजेन्द्र कळमकर, तेल्हारा संघटक बोदळे, बाश्रीटाकळीचे संघटक आरिफ शहा यांच्यासह देविदास घुगे, प्रकाश ढोके, भुषण खवले, मंदा इंगळे, ललीता राठोड, सुनंदा पुरी, कैलास इंगोले, संजय श्रृंगारे, अत्रीनंदन इंगळे, अलीम शहा, विक्रम रायचंद, उमेश तरले, भरत इंगळे आदींसह बहुसंख्य सुरक्षा रक्षक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असे जिल्हा संघटक अशोक अबगड यांनी कळविले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola cityअकोला शहरagitationआंदोलन