एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:59 IST2020-11-13T10:59:46+5:302020-11-13T10:59:55+5:30

Akola GMC News प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने विद्यार्थी प्रवेशाच्या तयारीस लागले आहेत.

Akola GMC : Start MBBS admission process | एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

अकोला: एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ऑल इंडिया कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, स्टेट कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. स्टेट कोट्यातील प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला असून, विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. सध्या एमबीबीएसच्या ऑल इंडिया कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने विद्यार्थी प्रवेशाच्या तयारीस लागले आहेत. बहुतांश विद्यार्थी स्टेट कोट्यातील प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अद्याप स्टेट कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील सर्वच १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या नियंत्रणांतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Web Title: Akola GMC : Start MBBS admission process