अकोला : शिवर येथील युवकाची हत्या करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:19 IST2018-01-05T02:18:34+5:302018-01-05T02:19:57+5:30

अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यप्राशन करून असलेल्या शिवर येथील गणेश सुरतकर या युवकाची हत्या करणार्‍या इराणी वसाहतमधील युसूफअली नादरअली याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीने गणेशच्या शर्टची कॉलर धरुन त्याला फरपटत नेले होते. यावेळी गणेशच्या गळय़ाला फास लागून त्याचा श्‍वास गुदरमला अन् त्याचा काही वेळाने मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

Akola: Gajaad, the murderer of Shiva's youth | अकोला : शिवर येथील युवकाची हत्या करणारा गजाआड

अकोला : शिवर येथील युवकाची हत्या करणारा गजाआड

ठळक मुद्देशिवर येथील गणेश सुरतकर या युवकाची हत्याइराणी वसाहतमधील युसूफअली नादरअली याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यप्राशन करून असलेल्या शिवर येथील गणेश सुरतकर या युवकाची हत्या करणार्‍या इराणी वसाहतमधील युसूफअली नादरअली याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीने गणेशच्या शर्टची कॉलर धरुन त्याला फरपटत नेले होते. यावेळी गणेशच्या गळय़ाला फास लागून त्याचा श्‍वास गुदरमला अन् त्याचा काही वेळाने मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
गणेश अशोक सुरतकर याचा आमलेटच्या गाडीजवळ असताना त्याच्याशी एकाने वाद घातला. त्यानंतर गणेशला तेथे असलेल्या युसूफअली नादरअली (वय २७ रा. अशोक आंबेडकर नगर इराणी झोपडपट्टी) याने कॉलर धरून खेचत नेले होते. 

Web Title: Akola: Gajaad, the murderer of Shiva's youth