अकोला : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 09:46 IST2020-05-01T09:42:45+5:302020-05-01T09:46:08+5:30

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Akola: Flag hoisting at the Collectorate on the occasion of Maharashtra Day | अकोला : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अकोला : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

ref='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला :महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, १ मे रोजी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचीही उपस्थिती होती.या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन उपस्थितांनी राष्ट्रगीताद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

Web Title: Akola: Flag hoisting at the Collectorate on the occasion of Maharashtra Day