शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

अकोला: ....अखेर शालेय गणवेशाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:40 IST

जि.प. सीईओंनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन गणवेशाचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले.

ठळक मुद्दे शालेय गणवेशासाठी ४ कोटी रूपयांचा निधी पाठवून महिना झाला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुटीवर असल्यामुळे गणवेशाच्या निधीची फाईल अडकून पडली होती. यासंदर्भात लोकमतने गणवेशाचा घोळ सदराखाली वृत्त प्रकाशित केले.

अकोला: समग्र शिक्षा अभियानातर्गंत जिल्ह्यातील ६८ हजार एससी, एसटी, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मोफत शालेय गणवेशासाठी शासनाने ४ कोटी ८ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला दिला होता. परंतु सीईओ सुटीवर असल्याने, हा निधी रखडला होता. यासंदर्भात लोकमतने गणवेशाचा घोळ सदराखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, जि.प. सीईओंनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन गणवेशाचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. अखेर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यामुळे शालेय गणवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.यंदा २0१८-१९ मध्ये ६८ हजार १५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ४ कोटी ८ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. परंतु शाळा सुरू होऊन महिना झाला तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अद्याप मिळाला नाही. शेकडो पालकांना तर स्वखर्चातून गणवेश खरेदी करावा लागला. शालेय गणवेशासाठी ४ कोटी रूपयांचा निधी पाठवून महिना झाला. केवळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुटीवर असल्यामुळे गणवेशाच्या निधीची फाईल अडकून पडली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांना निधीसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. निधीच्या फाईलवर स्वाक्षरी होत नसल्याने, पंचायत समिती स्तरावर गणवेश कापडाची खरेदी लांबणीवर पडली होती. यासंदर्भात लोकमतने गणवेशाचा घोळ असे वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत, जि.प. सीईओंनी घेतली आणि प्रभारी सीईओंना गणवेश निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे प्रभारी सीईओ कुलकर्णी यांनी तातडीने गणवेश निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करून गणवेशाचा मार्ग केला. शिक्षण विभागाने हा निधी गटशिक्षणाधिकारी स्तरावर वितरीत केला असून, लवकरच या निधीचे प्रत्येक तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात येणार आहे.

असे होईल निधीचे वाटपअकोला-             ८0२६२00  अकोट-               ६६४८000बाळापूर-             ५८६८000बार्शिटाकळी-       ४६९१४00मुर्तिजापूर -         ४0४१000पातूर-                 ३६४६२00तेल्हारा-            ५0८२000जि.प. सीईओ सुटीवर असल्यामुळे गणवेश निधीची फाईल थांबली होती. परंतु आता त्यांच्या आदेशानुसारच प्रभारी सीईओंनी ४ कोटी ८ लाख रूपयांच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे निधीचे गटशिक्षणाधिकारी स्तरावर वितरण करण्यात आले. लवकरच शाळा व्यवस्थापन समित्यांना हा निधी पाठवून गणवेशाचे कापड खरेदी करण्यात येईल.देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारीप्राथमिक, जि.प. 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद