शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अकोला : एक शून्य वाढल्याने फाइलचा दोन महिने प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:11 AM

अकोला : आर्थिक बाबीच्या फाइलमध्ये आकडा लिहिताना चूक झाल्यास दुरुस्तीसह मंजुरीसाठी किती काळ लागावा, याचे मासलेवाइक उदाहरण महिला व बालकल्याण विभागाने अर्थ विभागात सादर केलेल्या सतरंजी खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या प्रस्तावातून पुढे आले आहे.

ठळक मुद्देसतरंजी खरेदीसाठी १४ लाखांऐवजी झाले १ कोटी ४0 लाख

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आर्थिक बाबीच्या फाइलमध्ये आकडा लिहिताना चूक झाल्यास दुरुस्तीसह मंजुरीसाठी किती काळ लागावा, याचे मासलेवाइक उदाहरण महिला व बालकल्याण विभागाने अर्थ विभागात सादर केलेल्या सतरंजी खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या प्रस्तावातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, अर्थ विभागातच १४ लाखाच्या आकड्यात एक शून्य वाढल्याने झालेला एक कोटी ४0 लाखाच्या आकड्यानुसार निधी कसा द्यावा, असा आक्षेप घेत फाइल परत फिरवण्याचा प्रकारही घडत आहे.महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांमध्ये बालकांना बसण्यासाठी सतरंजी वाटप योजनेस सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूदही केली नाही. दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाच्या सेल्स गर्ल्स, रोपवाटिका प्रशिक्षणासाठी युवती, महिलांचे अर्जच नाहीत. दोन योजनांवर अनुक्रमे ९ आणि ५ लाख रुपये तरतूद होती. तो १४ लाखांचा निधी सतरंजी वाटप योजनेसाठी वळता करण्याला अर्थ समितीची मंजुरी मिळावी, यासाठी महिला व बालकल्याण विभागाने प्रस्ताव नोव्हेंबरच्या सभेपूर्वी अर्थ विभागात पाठवला; मात्र त्या महिन्यातील समितीच्या पुढे तो आला नाही. त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या सभेतही हा प्रस्ताव आला नाही. याबाबतची माहिती महिला व बालकल्याण विभागाने घेतली असता, त्या फाइलमध्ये लिहिलेल्या आकड्यातच मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले. अर्थ विभागात फाइल सादर झाल्यानंतर पुढील प्रक्रियेदरम्यान, आधीच्या १४ लाख रकमेत एक शून्य वाढवून लिहिण्यात आले. त्यामुळे ती रक्कम थेट एक कोटी ४0 लाखावर पोहोचली. एवढी रक्कम सतरंजी वाटपासाठी कशी वळती करता, असा सवाल अर्थ विभागाने उपस्थित केला आहे. याच मुद्यावरून फाइल दोन महिन्यांपासून अर्थ विभागातच फिरत आहे. निधी वळता न झाल्यास सतरंजी खरेदी कशी करावी, हा प्रश्न महिला व बालकल्याण विभागाला पडला आहे. 

अर्थ समितीची तहकूब सभा आजसतरंजी खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या प्रस्तावाला अर्थ समितीच्या २२ डिसेंबर रोजीच्या बैठकीत मंजुरी मिळणे आवश्यक होते. ती सभा कोरमअभावी तहकूब आहे. उद्या, २९ डिसेंबर रोजी ती सभा होत आहे. आता वेळेवरच्या विषयामध्ये महिला व बालकल्याणचा विषय घेणे अशक्य आहे. त्यामुळे हा प्रस्ताव थेट जानेवारीच्या बैठकीतच ठेवावा लागणार आहे. 

प्रशिक्षण योजनेला वस्तू खरेदी समितीचा अडसरमुलींसाठी ३0 लाख रुपये निधीतून संगणक प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. त्या फाइलला तांत्रिक मंजुरी मिळावी, यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अर्थ विभागाकडे पाठवली. त्या फाइलनुसार महिला व बालकल्याण विभागाला प्रशिक्षण सेवा खरेदी करावयाची आहे. त्यामुळे ती फाइल मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या खरेदी समितीपुढे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. ही समिती कार्यालयीन वापराच्या वस्तू खरेदीसाठी असल्याने हा विषय समितीपुढे कसा ठेवावा, या घोळातही महिला व बालकल्याण विभाग अडकला आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर