अकोला शहरात जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ वाढवली!
By संतोष येलकर | Updated: October 20, 2023 14:59 IST2023-10-20T14:59:10+5:302023-10-20T14:59:38+5:30
नवदुर्गा उत्सव : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अकोला शहरात जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ वाढवली!
अकोला: अकोला शहरात नवदुर्गा उत्सवानिमित्त गरबा रास आदी कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. हे लक्षात घेऊन शहरात जड वाहनाच्या प्रवेश बंदीची वेळ दोन तासांनी वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी दिला.
उत्सवाच्या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्सवानिमित्त शहरातील रस्त्यांवर वाढलेली रहदारी लक्षात घेऊन मूळ अधिसूचनेत दि. १८ ऑक्टोबरपासून अंशत: बदल करून दि. २४ ऑक्टोबरपर्यंत जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.