शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
2
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
5
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
6
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
7
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
8
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
9
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
10
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
11
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
12
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
13
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
14
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
15
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
16
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
17
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
18
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
19
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

अकोला : अतिक्रमण विभागातील अधिकार्‍याला अतिक्रमकांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:45 AM

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्‍याला व कर्मचार्‍याला गांधी रोडवरील अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसात दिलेली तक्रार अवघ्या दहा मिनिटांत परत घेतल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपोलिसात दिलेली तक्रारही घेतली मागेकर्मचार्‍यांचे खच्चीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्‍याला व कर्मचार्‍याला गांधी रोडवरील अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसात दिलेली तक्रार अवघ्या दहा मिनिटांत परत घेतल्याची माहिती आहे. संबंधित अधिकार्‍याच्या कृतीमुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकारामुळे मनपा कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे बोलल्या जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांची बजबजपुरी माजली आहे. गांधी रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, गांधी चौक ते मोहम्मद अली मार्ग, गांधी चौक ते तहसील कार्यालय, टिळक रोड यासह सर्वच प्रमुख रस्त्यांवर लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पहावयास मिळते. वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची आहे. आजरोजी या विभागात अंदाधुंद कारभार निर्माण झाला असून, खुलेआम अतिक्रमकांसोबत ‘सेटिंग’ केली जात आहे. अतिक्रमकांजवळून हप्तेखोरी करणार्‍या काही अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे अतिक्रमकांसोबतच जनमानसात मनपा प्रशासनाचा कवडीचाही धाक उरला नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळेच अतिक्रमकांचे मनोबल उंचावल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिक्रमण विभागाकडून गांधी रोडवर मनपाच्या आवारभिंतीलगत रेडीमेड कापड विक्रीची दुकाने थाटणार्‍या अतिक्रमकांना तात्पुरते हुसकावल्या जाते. सदर अतिक्रमक त्यांच्या हातगाड्या तहसील रोडवर उभ्या करतात. तास-दोन तास हा खेळ चालल्यानंतर पुन्हा मनपाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमक त्यांचा व्यवसाय उभारत असल्याचे चित्र नित्यनेमाचे झाले आहे. सहा दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍याने मनपाच्या आवारभिंतीलगतच्या अतिक्रमकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत सदर अधिकारी व कर्मचार्‍याला बदडून काढल्याची घटना घडली. 

कर्मचार्‍यांचे खच्चीकरणतगड्या मानधनावर कार्यरत अधिकार्‍याने पोलीस तक्रार परत घेतल्यामुळे साहजिकच अतिक्रमकांचे मनोबल उंचावले आहे, तर अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी संबंधित अधिकारी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सुध्दा अधिनस्थ कर्मचार्‍यांबद्दल दिशाभूल करणारी माहिती पुरवित असल्याचे बोलल्या जात आहे. 

तक्रार परत का घेतली?अतिक्रमकांनी मनपाच्या एका अधिकार्‍याला एवढा चोप देण्याची ही पहिलीच घटना आहे. अतिक्रमकांनी चोप दिल्यानंतर संबंधित अधिकार्‍याने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली खरी पण, अवघ्या दहा ते बारा मिनिटांत ही तक्रार मागे घेतली. ही तक्रार देताना व मागे घेताना मनपा प्रशासनाची परवानगी घेतली होती का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCrimeगुन्हा