शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पिकांसाठी वापरणार सांडपाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:49 AM

अकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठी कृषी विद्यापीठ प्रशासन महापालिकेला पाच एकर जागा देणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देतीव्र टंचाई पाण्यावर करणार प्रक्रिया; प्रस्ताव तयार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठी कृषी विद्यापीठ प्रशासन महापालिकेला पाच एकर जागा देणार असल्याचे वृत्त आहे.यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. धरणातील जेमतेम पाण्याचा पिण्यासाठी प्राधान्यक्रम असल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांनाही पाणी मिळणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. तीव्र टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची संशोधन जगविण्याची धडपड सुरू  आहे. कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणी रंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्रे आहेत; पण पाणीच नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नाही. बोअरच्या पाण्यावर संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड सुरू  आहे. 

बोअरवेलच्या पाण्यावर संशोधन कृषी विद्यापीठात काही भागात बोअरवेल आहेत; पण यावर्षी कृषी विद्यापीठ परिसरातील पाणी पातळी दीड ते दोन मीटरने घसरली आहे. जे काही पाणी उपलब्ध आहे, त्या पाण्यावर रब्बी बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू  आहेत; पण उन्हाळ्यात पाणी मिळणारच नसल्याने शहरातील सांडपाणी प्रक्रिया करू न ते वापरण्याचे नियोजन केले आहे. 

पाचशे ते सातशे एकरावर होईल सिंचन शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करू न ते पाणी ५00 ते ७00 एकरावरील पिकांना पाणी वापरण्यासाठीचे नियोजन केले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तासोबत दीर्घ चर्चा झाली.

दोन प्रकल्प प्रस्तावित महापालिकेने दोन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित केले असून, शिलोडा येथे ३0 एमएलडीचा (३ कोटी लीटर) तर कृषी विद्यापीठात ७ एमएलडीचा (७0 लाख लीटर) प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

दररोज मिळणार 70 लाख लीटर शुद्ध पाणी कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाजवळील पाच एकर जागा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला देण्यात येणार असून, या माध्यमातून दररोज  ७0 लाख लीटर शुद्ध पाणी कृषी विद्यापीठाला देण्यात येणार आहे.

कृषी विद्यापीठाकडे कायमस्वरू पी पाण्याचे स्रोत बंद झाल्याने शहरातील सांडपाण्याचा उपयोग करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव महापालिकेला देण्यात येईल.- डॉ. व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

कृषी विद्यापीठ जागा उपलब्ध करू न देणार असल्याने तेथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प टाकण्यात येईल. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून जागेच्या बदल्यात प्रकल्प देखभाल दुरुस्तीच्या खर्चाबाबत चर्चा करू , त्यासाठी प्रथम प्रस्ताव येणे महत्त्वाचे आहे.- विजय अग्रवाल, महापौर, महापालिका, अकोला

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहरWaterपाणी