अकोला जिल्ह्यात वीज भडकणार !

By Admin | Updated: November 4, 2015 02:38 IST2015-11-04T02:38:20+5:302015-11-04T02:38:20+5:30

शेतक-यांनी वाचला समस्यांचा पाढा.

Akola district will hit the electricity! | अकोला जिल्ह्यात वीज भडकणार !

अकोला जिल्ह्यात वीज भडकणार !

कुरुम (जि. अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथे शेतकर्‍यांनी विद्युत पुरवठय़ाबाबत समस्यांचा पाढाच वाचला. महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी २९ ऑक्टोबरला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासनसुद्धा दिले. गत तीन वर्षांपासून विजेचा उच्चदाब नसल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद पडतात. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मधापुरी परिसरातील पिकांना बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे मूग, उडीद, ज्वारी ही नगदी पिके हातची गेली तसेच कपाशी व तूर ही पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच विजेचा उच्चदाब न मिळणे ही सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. गहू, हरभर्‍यासाठी जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे रबी हंगामातही दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारनियमन, विजेचा लपंडाव, विद्युत दाब कमी असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, २९ ऑक्टोबरला महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांना शेतकर्‍यांशी संवाद साधला. विद्युत दाब वाढविणे व खराब झालेले विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनातून केली.

Web Title: Akola district will hit the electricity!