अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:28 PM2019-06-19T12:28:23+5:302019-06-19T12:28:38+5:30

मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.

Akola District Transfers 254 Police! | अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

Next

अकोला: गत काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. जिल्ह्यातील १0२ पोलीस कर्मचाºयांच्या विनंतीनुसार तर १५२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत.
महिनाभरापूर्वी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांची माहिती मागविली होती. बदल्या करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा एका अर्जामध्ये माहिती सादर केली होती. मंगळवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये १0२ पोलीस कर्मचाºयांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच १५२ पोलीस कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक कलासागर यांनी बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’चे वातावरण आहे. काही कर्मचाºयांच्या विनंतीनुसार बदल्या मिळाल्याने त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. काही पोलीस कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या झाल्या. प्रशासकीय कारणास्तवाने अनेक पोलीस कर्मचाºयांना अवघड क्षेत्रातील पोलीस ठाणे मिळाल्यामुळे निरुत्साह दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Akola District Transfers 254 Police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.