शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ाला ‘अवकाळी’चा तडाखा : पिके मातीत; स्वप्न भंगले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:23 IST

अकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात खरीप हंगामातील मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उत्पादनही कमी झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व इतर पिकांचे उत्पादन चांगले होण्याचे स्वप्न रंगविले होते; परंतु गत रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, केळी ही फळपिके आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या असून, गारपिटीच्या तडाख्यात हरभरा व गहू मातीत मिसळला. अवकाळी पावसात भिजलेला कापूस गळून मातीत मिसळला तसेच कांदा व इतर भाजीपाला पिकेही मातीत मिसळली. हाताशी आलेली  पिके मातीत मिसळल्याने, पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाचे शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे. त्यानुषंगाने हवालदिल झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत  शासनामार्फत मदत मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

उमई परिसरात गारपीट; अकोल्यात पाऊसउमईसह जांब, जितापूर नाकट, खरप ढोरे, समशेरपूर परिसरात मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा आणि तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर रात्री अकोला शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच आलेगाव येथेही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. 

पंचनाम्यानंतर समोर येणार पीक नुकसानाचे वास्तव!अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात केवळ ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ातील पीक नुकसानाचे वास्तव पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

शेतात  कापणीनंतर हरभर्‍याच्या पेंड्या अवकाळी पावसात भिजल्या आणि हरभरा मातीत मिसळला. तसेच भिजलेला कापूस मातीत मिसळला. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण