अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 18:49 IST2022-08-03T18:49:22+5:302022-08-03T18:49:53+5:30

Eknath Shinde Group Akola : अश्वीन नवले व विठ्ठल सरप यांची जिल्हाप्रमुखपदी तर याेगेश अग्रवाल यांची महानगर प्रमुख पदी नियुक्तीची घाेषणा बुधवारी मुंबईत करण्यात आली.

Akola district Shiv Sena office bearer appointments announced | अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख

अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख

 अकाेला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटानेही अकाेल्यासाठी दाेन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत. अश्वीन नवले व विठ्ठल सरप यांची जिल्हाप्रमुखपदी तर याेगेश अग्रवाल यांची महानगर प्रमुख पदी नियुक्तीची घाेषणा बुधवारी मुंबईत करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी मुंबईत शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला त्यानंतर त्यांची अकाेला जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली हाेती. मंगळवारी बाजाेरिया यांनी पदाधिकाऱ्यांसाेबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन अकाेल्यात संघटना बांधणीसाठी नियुक्ता करण्याबाबत चर्चा केली त्यानंतर अकाेला पश्चीम, मुर्तीजापूर व अकाेट या विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून अश्वीन नवले, बाळापूर व अकाेला पूर्व या विधानसभा मतदारसंघासाठी विठ्ठल सरप यांची नियुक्ती करण्यात आली. अकाेला महानगरप्रमुख म्हणून शिवसेनेचे उपशहरप्रमुख असलेले याेगेश अग्रवाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाप्रमुख म्हणून याेगेश बुंदिले, उपजिल्हाप्रमुखपदी शशिकांत चाेपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Akola district Shiv Sena office bearer appointments announced