शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अकोल्यात शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 02:13 IST

अकोला : रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता  किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन  देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राऊत यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हा  प्रमुखांसह कंत्राटदारावर शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देअभियंत्यास मारहाण प्रकरणकंत्राटदारही आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता  किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन  देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राऊत यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हा  प्रमुखांसह कंत्राटदारावर शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषदेचे शासकीय कंत्राटदार अक्षय कुलकर्णी यांनी गत तीन महिन्यांपूर्वी  एका रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने  देयक शाखा अभियंता किशोर राऊत यांच्याकडे सादर केले. त्यानंतर वारंवार पाठ पुरावा केला; मात्र शाखा अभियंता राऊत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद  मिळाला नाही. या प्रकारामुळे कंत्राटदार कुलकर्णी हतबल झाल्यानंतर त्यांनी हा  प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाप्रमुख  देशमुख हे कंत्राटदाराला सोबत घेऊन शाखा अभियंता किशोर राऊत यांच्या  दालनामध्ये गेले. यावेळी त्यांना देयकाबाबत विचारणा केली असता, राऊत यांनी  समाधानकारक उत्तर न दिल्याने देशमुख यांचा पारा चढला. शाखा अभियंता व  जिल्हाप्रमुख यांच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर जिल्हाप्रमुख देशमुख यांच्याशी मग्रुर  भाषेत संवाद साधणार्‍या राऊत यांच्यावर शिवसैनिकांनी हात उगारला. या घटनेनंतर  शाखा अभियंता राऊत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कंत्राटदार अक्षय  कुलकर्णी यांच्या विरोधात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची  तक्रार पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध ३५३,३३२,  ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहरShiv Senaशिवसेना