शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अकोला जिल्ह्याला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:24 IST

Akola News : वादळी वारा सुटल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी ७ पासून खंडित झाला होता.

ठळक मुद्देसोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; झाडे उन्मळून पडली!शहरात अनेक ठिकाणी नुकसान घरांची पडझड, टीनपत्रे उडाले

अकोला : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ‘तौउते’ चक्रीवादळाचे परिणाम दिसून आले. शहरात रात्री ७ वाजेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी दुकानांचे नुकसान झाले. यावेळी घरांची पडझड झाली असून, टीनपत्रेही उडाली, तर ग्रामीण भागातही नुकसान झाले आहे.

मंगळवारी तौउते चक्रीवादळ गुजरात सीमेवर पोहोचले व आपल्या उच्चतम स्थितीपर्यंत पोहोचत आहे. वादळाचे विस्तारित टोक/घेर विदर्भापर्यंत पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी झालेल्या नुकसानीनंतर मंगळवारी पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री ७ वाजेच्या सुमारास शहरात जोरात वादळी वारा सुटला होता. अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. ग्रामीण भागातही मोठे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, यापुढेही वातावरण ढगाळलेले, उष्ण-दमट राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

 

वीज खांब कोसळला!

वादळी वारा सुटल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी ७ पासून खंडित झाला होता. गांधी चौकातील वीज खांब उखडून खाली पडला. मोठ्या प्रमाणात वीज तारा तुटून पडल्या होत्या.

 

वातावरणात गारवा

कडक निर्बंध असल्याने नागरिक घरातच आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा बसत नसला तरी उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. अर्धा तास पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

 

उन्हापासून बचावासाठी उभारलेले मंडप कोसळले!

कडक निर्बंध असल्याने शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचावासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे मंडपही कोसळले.

 

झाड पडल्याने घरासह दुकानांचे नुकसान

शहरातील जयहिंद चौकातील जुने पिंपळाचे झाड उन्मळून पडले. यामुळे ८-१० दुकानांचे नुकसान झाले व एका घराच्या भिंती कोसळल्या. यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 

पोपट गतप्राण; वादळाचा फटका

वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने याचा फटका सर्वसामान्यांसह पोपट पक्ष्यांना बसला. काही ठिकाणी पोपट गतप्राण अवस्थेत आढळले. वादळाचा फटका बसलेल्या एका पोपट पक्ष्याला सीटी कोतवाली ठाण्याच्या कर्मचाऱ्याने जीवदान दिले.

 

येथे झाडे उन्मळून पडली!

पोलीस वसाहतीच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर झाड कोसळल्याने नुकसान झाले. देवी पोलीस लाइनजवळ, गांधी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ, बी. आर. हायस्कूलजवळ व वर्धमान हॉस्पिटलजवळ झाड उन्मळून पडले होते.

शहरातील विद्युत पुरवठा प्रभावित

अकोला : वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसाचा फटका वीज यंत्रणेला बसला असून, अकोला शहर विभागातील ३३ केव्ही क्षमतेचे चार विद्युत उपकेंद्र बंद पडल्याने निम्म्या शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील जम्बो कोविड सेंटर, जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी प्राधान्याने या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने रुग्णांचा जीव भांड्यात पडला. वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील ११ केव्हीच्या ३८ फिडर्सवरील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. जुने शहर, मध्यवर्ती बाजारपेठ, कौलखेड, मलकापूर, उमरी आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन कराव लागला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतलले होते.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस