शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर चर्मकार समाजाने काढला धडक मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:29 IST

विविध ११ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला शहरातील अशोक वाटिका येथून मोर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक, गांधी रोड, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

अकोला : संत रविदास महाराज जयंतीची सरकारी सुटी जाहीर करण्यात यावी, बाबू जगजीवनराम चर्मकार आयोग स्थापन करून तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध ११ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.चर्मकार समाजाच्या विविध ११ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला शहरातील अशोक वाटिका येथून मोर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक, गांधी रोड, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मागण्या पूर्ण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ प्रमुख गजानन भटकर, विदर्भ युवा प्रमुख रामा उंबरकर, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश ठोंबरे, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर ढाकरे यांच्यासह सुनील गवई, आशा चंदन, प्रवीण चोपडे, राधेश्याम कळसकार, अनिल उंबरकार, पांडुरंग वाडेकर, सुनील पानझाडे, रामा ताजने, विश्वनाथ चापके, अजय पदमने, शिवलाल इंगळे, संतोष इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिरभाते, छाया इंगळे, संज्योती मांगे, किशोर काकडे, संदीप कदम, रवींद्र मालखेडे, नागोराव ठोसरे, भोनाजी ठोंबरे, योगेश इंगळे, प्रवीण परिहार, आकाश टाले, जगदेवराव टाले, गजानन नाचने, जगदेवराव वानेडकर, बाळू हिरेकर यांच्यासह चर्मकार महासंघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते व समाज बांधव सहभागी झाले होते. ‘या’ मागण्यांसाठी काढला मोर्चा!संत रविदास महाराज जयंतीची सरकारी सुटी जाहीर करण्यात यावी, बाबू जगजीवनराम चर्मकार आयोग स्थापन करून त्याची तातडीने अंंमलबजावणी करण्यात यावी, चर्मोद्योग विकास महामंडळाचे कर्ज शंभर टक्के माफ करण्यात यावे, समाजातील गरजू व बीपीएलधारकांना घरकुलांमध्ये प्राधान्य देण्यात यावे, चर्मकार समाजातील भूमिहीन शेतमजुरांना शेतजमीन मिळावी, गटाई कामगारांना स्टॉल व जागा कायमस्वरूपी देण्यात यावी, अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती नियमित देण्यात यावी, जिल्हा व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संत रविदास महाराज सभागृह देण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगार व होतकरू बेरोजगारांसाठी प्रशिक्षण योजना सुरू करण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, भारतीय संविधानात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय