आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना

By राजेश शेगोकार | Updated: September 11, 2022 12:45 IST2022-09-11T12:43:54+5:302022-09-11T12:45:46+5:30

सांगोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंडर 18 बास्केटबॉल स्पर्धेसाठी अकोला संघ रविवारी रवाना झाला आहे

Akola District Basketball Amateur Association team leaves for Inter District Basketball Tournament | आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना

आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना

राजेश शेगोकार 

अकोला - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंडर 18 बास्केटबॉल स्पर्धेसाठी अकोला संघ रविवारी रवाना झाला आहे. या संघाची कर्णधारची जबाबदारी गवरंग वासनिककडे असून कौस्तुभ पाटील, वेद राऊत, आदित्य आवारे, ओम चौधरी, वेदांत चौहान, महेश मोडक, यश जाधव, रिशांत वाडेवाले, मधुर हातोलकर, कश्यभ दामले, चैतन्य कौयणार या खेळाडूंचा समावेश आहे.

संघ प्रशिक्षक म्हणून कैलास बोराडे आहेत..स्पर्धेसाठी अकोला संघ रवाना झाला यावेळी अकोला जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय मालोकर, तसेच उपाध्यक्ष पुरण गंगतिरे, सचिव स्वप्नील बनसोडसह इतर सदस्य देखील उपस्थितीत होते. तर यावेळी खेळाडूंच्या पालकांचीही  उपस्थिती होती. यावेळी विजय मालोकार यांनी संघातील खेळाडू सोबत संवाद साधून खेळाडूंना मार्गदर्शन व  पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
 

Web Title: Akola District Basketball Amateur Association team leaves for Inter District Basketball Tournament