शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अकोला : शैक्षणिक, तंत्रज्ञानाचा करणार विकास; डॉ.पंदेकृविचा इथिओपियासोबत सामंजस्य करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:05 AM

अकोला : शेती, कृषी शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन शैक्षणिक, तंत्रज्ञान विकासासाठी  इथिओपियाच्या वोल्काईट विद्यापीठासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शनिवारी सामंजस्य करार केला. 

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाने मागील चार महिन्यांत विविध देशातील नामवंत विद्यापीठांसह देशातील कंपन्यांसोबत केला करार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेती, कृषी शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन शैक्षणिक, तंत्रज्ञान विकासासाठी  इथिओपियाच्या वोल्काईट विद्यापीठासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शनिवारी सामंजस्य करार केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागतिक कीर्तीचे कृषी क्षेत्रात संशोधन तसेच तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. परंतु, तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, विश्‍वात होणार्‍या या संशोधन,तंत्रज्ञानाची माहिती विदर्भासह संपूर्ण देशाला होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने मागील चार महिन्यांत विविध देशातील नामवंत विद्यापीठांसह देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. इथिओपिया व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शिक्षण व संशोधनाचा दृष्टिकोन सारखा असून, या कराराच्या माध्यमातून दोन्ही विद्यापीठाचे कृषी शिक्षण व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होईल. तदव्तच येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील त्या विद्यापीठातील कृषी शिक्षणविषयक सोयी, सुविधा व संसाधनाचा उपयोग करू न घेता येईल.इथिओपियाच्या वोल्काईट विश्‍वविद्यालयांतर्गत सात महाविद्यालये असून, १,५00 क्षमता असलेली ४६ स्नातकोत्तर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षेखाली पार  पडलेल्या कार्यक्रमाला वोल्काईट विश्‍वविद्यालयाचे सुशील सक्करवार, डॉ. पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. पी.आर.कडू, कापणीपश्‍चात संशोधन तंत्रज्ञान विभागाचे संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, नियंत्रक विद्या पवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ