शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अकोला : पार्किंगच्या जागांवरून विभाग प्रमुखांचा ‘केमिकल लोचा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:26 AM

अकोला : शहरात महापालिकेच्या जागा पार्किंगसाठी राखीव असताना त्यांची अचूक संख्या किती, त्या कोठे आहेत, याबाबत खुद्द अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले अनभिज्ञ असल्याचे समोर येताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विभाग प्रमुख इंगोले यांना चांगलेच शाब्दीक फटकारे लगावले. यापुढे विभागाची परिपूर्ण माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

ठळक मुद्देजागांची माहितीच नाहीआयुक्तांनी सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात महापालिकेच्या जागा पार्किंगसाठी राखीव असताना त्यांची अचूक संख्या किती, त्या कोठे आहेत, याबाबत खुद्द अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले अनभिज्ञ असल्याचे समोर येताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विभाग प्रमुख इंगोले यांना चांगलेच शाब्दीक फटकारे लगावले. यापुढे विभागाची परिपूर्ण माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.शहराच्या मोक्याच्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. सदर जागा पार्किंगसाठी भाडेपट्टय़ावर दिल्या असून, त्यापासून मनपाला मोठा महसूल प्राप्त होतो. या जागांची देखभाल व त्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे आहे. सद्यस्थितीत शहरात २२ जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आल्याची नोंद मनपाच्या अतिक्रमण विभागात आहे. संबंधित विभागाने गतवर्षी २२ पैकी १२ जागा भाडेपट्टय़ावर दिल्याची माहिती आहे. यापासून मनपाला उत्पन्नापोटी १३ ते १४ लाख रुपये प्राप्त होतात. शहरात विविध कामानिमित्त येणार्‍या चारचाकी, दुचाकी, तीन चाकी वाहनधारकांसाठी पार्किं गच्या जागा उपलब्ध असणे क्रमप्राप्त असताना सदर जागांवर लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. खासगी कंत्राटदारांच्या संमतीने अतिक्रमकांनी व्यवसाय उभारले असून, त्याबदल्यात कंत्राटदारांचे खिसे भरले जात आहेत. यादरम्यान, संबंधित कंत्राटदारांचा क रारनामा डिसेंबर महिन्यात संपुष्टात आल्यानंतरही त्यांच्याकडून जुन्या दरानुसार पैसे वसूल केले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने पार्किं गसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच, अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या कामकाजाची विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांना इत्थंभूत माहिती असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार समोर आला. आढावा बैठकीत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पार्किं गच्या संदर्भात आत्माराम इंगोले यांना माहिती विचारली असता ते अनभिज्ञ असल्याचे समोर आले. 

जागेचा सर्व्हे करण्याची गरजआजरोजी शहरात पार्किंगसाठी नेमक्या जागा किती, यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. ज्या जागा पार्किंगसाठी भाडेपट्टय़ावर दिल्या आहेत, त्यातही जाणीवपूर्वक घोळ करून ठेवला आहे.कागदोपत्री पार्किंगच्या जागा दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचा वापरच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. हा सर्व प्रकार पाहता मनपा प्रशासनाने पार्किंंगच्या जागांसाठी शहरात सर्व्हे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पदाधिकारी अंधारातशहरातील पार्किंगच्या जागांवर अतिक्रमकांनी ठिय्या मांडला असतानाही अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही. अर्थातच, या विभागातील कर्मचारी किती प्रामाणिक आहेत, याचा प्रत्यय येतो. काही जागा परस्पर हॉकर्स झोनसाठी राखीव ठेवण्यापर्यंंत अतिक्रमण विभागाने मजल गाठली आहे. शहराची धोरणात्मक बाब लक्षात घेता पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेणे अपेक्षित असताना त्यांना अंधारात ठेवले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे अतिक्रमण विभागाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkola cityअकोला शहर