लोकमत न्यूज नेटवर्कउरळ (अकोला): बसखाली सापडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उरळ येथील बसस्थानकावर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. उरळ येथील शिवशंकर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकणारा ओम प्रभाकर इंगळे (वय १२) रा. मोरगाव भाकरे, हा सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी बसस्थानकावर उभा होता. गावाकडे जाणार्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना, विद्यार्थ्यांची व अन्य नागरिकांची एकच गर्दी झाल्याने ओमचा तोल गेला व तो बसच्या मागच्या चाकाजवळ पडला; त्याच वेळेस बस सुरू झाल्याने बसची मागची चाके त्याच्या अंगावरून गेली. गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ ओमला रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती.
अकोला : उरळ येथे बसखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:08 IST
उरळ (अकोला): बसखाली सापडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उरळ येथील बसस्थानकावर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
अकोला : उरळ येथे बसखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
ठळक मुद्देउरळ बसस्थानकावर घडली हृदयद्रावक घटनाबसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना मागच्या चाकाखाली सापडलाअकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला मृत्यू