खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:47 PM2019-05-28T12:47:18+5:302019-05-28T12:47:25+5:30

पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

Akola; Crop loan allocation up to 14 percent! | खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

Next

- संतोष येलकर

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले; मात्र खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५४३ शेतकऱ्यांना १९४ कोटी ५७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.
२०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत गत १ एप्रिलपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना, जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १५ मेपर्यंत २२ हजार ५४३ शेतकºयांना १९४ कोटी ५७ लाख रुपये (१४ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच आहे. पीक बँकांकडून संथ गतीने पीक कर्जाचे वाटप सुरु असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना १ हजार २०४ कोटी २१ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बँकनिहाय असे आहे पीक कर्जाचे वाटप!
बँक                                                   शेतकरी                                रक्कम (कोटी)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक           १९,६९६                               १६४.७१
राष्ट्रीयीकृत बँका                               २,१०२                                  २३.१५
ग्रामीण बँक                                        ७४५                                      ०६.७१

शेतकरी अडचणीत 
शेती मशागतीच्या कामांसह बियाणे व खते आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, १ लाख ५२ हजार ३०४ शेतकºयांना पीक कर्जाचा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

Web Title: Akola; Crop loan allocation up to 14 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.