अकोला : झुरळ बु. येथे दोन घरांना आग; सहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:40 IST2018-02-04T23:39:59+5:302018-02-04T23:40:18+5:30
उरळ (अकोला): येथून जवळच असलेल्या झुरळ बु. (भनकपुरी) येथे दोन घरांना शॉर्ट सर्कि टमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.

अकोला : झुरळ बु. येथे दोन घरांना आग; सहा लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ (अकोला): येथून जवळच असलेल्या झुरळ बु. (भनकपुरी) येथे दोन घरांना शॉर्ट सर्कि टमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.
झुरळ बु. येथील माणिक संभूजी भोजने व कैलास सम्रत भोजने हे शेतात गेले असता शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरांना रविवारी आग लागली. या आगीत कैलास भोजने यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी बँकेतून आणलेले रोख ५0 हजारांसह कपडे, धान्य व साहित्य जळाल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घराशेजारी असलेल्या माणिक भोजने यांच्या घरापर्यंत आग गेली. त्यामध्ये घरातील सर्व साहित्य जळाल्याने त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. कवठा बु येथील नागोराव वाघ यांनी पेटलेल्या घरातून सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सहदेव मेटांगे, उपसरपंच गौतम घ्यारे, दिलीप पटोकार, जमादार दादाराव लिखार, पोकॉ मोरे, मेहत्रे आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. आगीमुळे दोघांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.