महात्मा गांधी यांचे जवळचे नातेवाईक कनुभाई मश्रुवाला यांचे निधन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:58 IST2020-05-02T17:55:53+5:302020-05-02T17:58:12+5:30

गांधीजींचा मुलगा मनिलाल यांच्याशी कनुभाईच्या बहिणीचे लग्न झाले होते.

Akola : Close relative of Mahatma Gandhi Kanubhai Mashruwala passes away | महात्मा गांधी यांचे जवळचे नातेवाईक कनुभाई मश्रुवाला यांचे निधन  

महात्मा गांधी यांचे जवळचे नातेवाईक कनुभाई मश्रुवाला यांचे निधन  

ठळक मुद्देगांधीमार्गावरील  खुले नाट्य गृहासमोर कनुभाईंचे निवासस्थान आहे. गांधीजींचा मुलगा मनिलाल यांच्याशी कनुभाईच्या बहिणीचे लग्न झाले होते.अशाप्रकारे गांधी परिवाराशी  अकोल्याची नाळ जुळली होती.

अकोला : महात्मा गांधी यांचे जवळचे नातेवाईक ,ज्येष्ठ गांधीवादी,अकोल्याच्या सामाजिक,सांस्कृतिक चळवळीचे  प्रेरणास्थान कनुभाई मश्रुवाला यांचे शनिवार,२ मे रोजी सकाळी निधन झाले.
गांधीमार्गावरील  खुले नाट्य गृहासमोर कनुभाईंचे निवासस्थान आहे.या राहत्या घरी शनिवारी  त्यांची प्राणज्योत मालवली.
महात्मा गांधीजींचा मुलगा मनिलाल यांच्याशी कनुभाईच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यांची दुसरी बहिण ताराबेन यांनी सर्वोदय आश्रम काढुन समाजसेवेला आपले जीवन समर्पित केले.अशाप्रकारे गांधी परिवाराशी  अकोल्याची नाळ जुळली होती.स्वातंत्र्याच्या आदोलनातही अकोला अग्रेसर होते.स्वदेशी शिक्षणाची मुहुर्तमेढ टिळक राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेने अकोल्यात झाली. राष्ट्रीय शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा कनुभाई मश्रुवाला यांनी सांभाळली.त्यांच्या निधनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचा आधारवड कोसळला आहे .

Web Title: Akola : Close relative of Mahatma Gandhi Kanubhai Mashruwala passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.