शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अकोला : नदीकाठच्या तीन किलोमीटर अंतराची होणार साफसफाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:47 AM

अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तथा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मंगळवारी केले. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत मोर्णा नदीची साफसफाई व त्याच्या नियोजनाच्या मुद्यावर अकोलेकरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देमहापौर, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांची अकोलेकरांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तथा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मंगळवारी केले. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत मोर्णा नदीची साफसफाई व त्याच्या नियोजनाच्या मुद्यावर अकोलेकरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीची दुर्दशा झाली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मोर्णा नदीचा वापर केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नदी पात्रात वाढलेली जलकुंभी, डासांची पैदास व दुर्गंधीमुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून मोर्णा नदीचे पात्र व नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या १३ जानेवारीपासून मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी नियोजन भवनमध्ये नदीच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेले नियोजन व इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांसह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, स्थायी समिती सभापती बाळ टाले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी महापौर सुमनताई गावंडे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रभात किड्सचे संचालक गजानन नारे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. राजेंद्र सोनोने, शत्रुघ्न बिरकड आदी उपस्थित होते. 

१४ पथकांचे केले गठन१३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या साफसफाईला सिटी कोतवाली चौक ते हिंगणा फाटा परिसरापर्यंत सुरुवात केली जाईल. एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन कामकाजात व्यत्यय येणार नाही, यासाठी १४ पथकांचे गठन करण्यात आल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली. प्रत्येक पथकात मनपाचे झोन अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश राहील. नदीकाठी तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात काठावर जाण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. नदीपात्रात उतरून जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी ६0 कामगारांची मदत घेण्यात आली आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरण्याची गरज नसून, केवळ काठावर जमा झालेली जलकुंभी, गाळ व कचरा उचलून मनपाच्या वाहनांमध्ये टाकावा लागेल, अशी माहिती प्रा. संजय खडसे यांनी दिली. मोहिमेत सहभागी होणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गमबूट, हातमोजे, चेहर्‍याला मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रा. खडसे यांनी सांगितले. 

सर्पमित्र, नैसर्गिक आपत्ती निवारण पथक ाची मदतनदीकाठावर मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे आहेत. काठावर तसेच नदीपात्रात साप असण्याची शक्यता गृहीत धरून त्या ठिकाणी सर्पमित्रांना तैनात केले जाणार आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती निवारण पथकांचीही मदत घेतली जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, पिण्यासाठी पाणी व नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आल्याची माहिती प्रा. संजय खडसे यांनी दिली. 

मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनशहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या साफसफाईसाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. अकोलेकरांनी या मोहिमेत योगदान देऊन शहर स्वच्छतेसाठी समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरriverनदीcollectorतहसीलदार