अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:09 IST2018-05-18T15:09:28+5:302018-05-18T15:09:28+5:30

अकोला : राष्ट्रीय महामार्गवर शिवनी विमानतळाजवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली.

In Akola, burning car on national highway | अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

ठळक मुद्देएम. एच. २६ एल. १५२४ क्रमांकाच्या कारने शिवनी विमानतळानजीक अचानक पेट घेतला. कारमध्ये असलेले सोहेब खान व चालक शे. नाशिर यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली व ते दोघेही बाहेर पडले. अकोला येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली.

अकोला : राष्ट्रीय महामार्गवर शिवनी विमानतळाजवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती .
प्राप्त माहितीनुसार एम. आय. डी सी कडुन अकोला शहराकडे जात असलेल्या एम. एच. २६ एल. १५२४ क्रमांकाच्या कारने शिवनी विमानतळानजीक अचानक पेट घेतला. कारमध्ये असलेले सोहेब खान व चालक शे. नाशिर यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली व ते दोघेही बाहेर पडले. घटनेची माहीती मिळातास एम. आय. डी सी. पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, बाबुराव चव्हाण, हेडकॉन्स्टेबल विजय जाधव यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अकोला येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली. पोलीसांनी पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.

 

Web Title: In Akola, burning car on national highway