शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अकोला : भाजप जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:58 PM

जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीची फेरनिवड केली जाते. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, बुधवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची निवड होणार आहे.भाजपच्या जिल्हा कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, निवडणूक निर्णय अधिकारी आ. गिरीष व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार असली तरी या दोन्ही पदासाठी पक्षातच मोठी स्पर्धा आहे. महानगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून या पदांसाठी चाचपणी केली जात आहे. या पदासाठी माजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती यांसह अनेक ज्येष्ठ आजी-माजी नगरसेवक इच्छुक आहेत. तर जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार रणधीर सावरकर यांचे नाव कार्यकर्त्यांमध्ये पहिल्या पसंतीचे आहे.यासोबतच कुणबी समाजाला प्राधान्य देण्याचीही मागणी पक्षातून पुढे येत असल्याची माहिती आहे . भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची धुरा स्वीकारण्यासाठी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याची माहिती आहे. पक्षातील गटातटाचे राजकारण पाहता जिल्ह्यावर कोणत्या गटाचा वरचष्मा राहतो, यावरच संबंधितांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा