मार्चमध्ये अकोला ठरला कोरोनाचा हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:00+5:302021-04-03T04:15:00+5:30
आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मार्च महिन्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ ...

मार्चमध्ये अकोला ठरला कोरोनाचा हॉटस्पॉट !
आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मार्च महिन्यात
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. मार्च महिन्यात ८६ जणांना कोविडमुळे जीव गमवावा लागला असून, ही परिस्थिती आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते.
असा आहे कोरोनाचा आलेख
महिना- रुग्ण - मृत्यू
एप्रिल - २८ - ०३
मे - ५५३ - २९
जून - ९६९ - ४७
जुलै - १०८७ - ३४
ऑगस्ट - १४०० - ४७
सप्टेंबर - ३४६८ - ८४
ऑक्टोबर - ८९३ - ४५
नोव्हेंबर - १०३३ - १२
डिसेंबर - १०५८ - २९
जानेवारी - ११३५ - १४
फेब्रुवारी - ४५२७ - ३१
मार्च - ११५५५ - ८६