शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

अकोला : दोन शाळांमध्ये होणार अटल टिंकरिंग लॅब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:54 AM

अकोला : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. देशातील १५0४ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब तयार होणार असून, यात अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील हमजा प्लॉटमध्ये शाहबाबू उर्दू हायस्कूलचा समावेश करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देलॅबसाठी मिळणार २0 लाख रुपये स्कूल ऑफ स्कॉलर्स, शाहबाबू शाळेचा समावेश

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. देशातील १५0४ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब तयार होणार असून, यात अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील हमजा प्लॉटमध्ये शाहबाबू उर्दू हायस्कूलचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित विषयातील नवीन संकल्पना रुजविणे व कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. इयत्ता सहावी ते बारावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या चिकित्सा व संशोधनात्मक विचारांना गती मिळावी आणि विज्ञान, गणित विषयांमध्ये त्यांची रुची निर्माण करून त्यांच्यात कौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत. गतवर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ९२८ शाळांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील ७५ शाळांचा समावेश होता. गतवर्षी अटल टिंकरिंग लॅबसाठी अकोल्यातील शाहबाबू उर्दू हायस्कूलची निवड करण्यात आली होती. या हायस्कूलमध्ये लॅब उभारणीचे काम सुरू आहे. यावर्षी या योजनेसाठी हिंगणा रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची निवड करण्यात आली आहे. या शाळेला अटल टिंकरिंग लॅब निर्मितीसाठी नीती आयोगाकडून २0 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळणार आहे. जिल्हय़ातील व शहरातील अनेक नामवंत शाळांनी अटल टिंकरिंग लॅबसाठी केंद्र शासनाच्या नीती आयोगाकडे प्रस्ताव पाठविले होते; परंतु यंदा एकाच शाळेची निवड करण्यात आली आहे. या लॅबची निर्मिती झाल्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर्समधील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. 

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅबसाठी शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची निवड झाली आहे. गतवर्षी शाहबाबू उर्दू हायस्कूलची निवड झाली होती. तिसर्‍या टप्प्यात जिल्हय़ातील चार ते पाच शाळांची निवड होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळांनी प्रस्ताव पाठवावेत.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा