Akola: शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक!
By रवी दामोदर | Updated: August 21, 2023 17:55 IST2023-08-21T17:52:42+5:302023-08-21T17:55:48+5:30
Akola: शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला.

Akola: शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक!
- रवी दामोदर
अकोला - कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात युरीयाचा मुबलक साठा दिसून येत असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची भटकंती होत आहे. शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला. याप्रसंगी ऑनलाईनमध्ये युरीयाचा साठा दिसून येत असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एसएओ शंकर किरवे व जिल्हा कृषी विकास अधिकारी महेंद्र सालके थेट शहरातील कृषी सेवा केंद्रात नेत झाडाझडती घेण्यास भाग पाडले. त्यावर एका कृषी सेवा केंद्रात युरीया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कारवाई करा, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, कोषाध्यक्ष दादाराव पवार, संघटक समीर पठाण, ॲड. प्रशिक मोरे, नितीन वानखडे, सचिन शिराळे, सुरेंद्र तेलगोटे, सुजित तेलगोटे, सूरज दामोदर, अक्षय वानखेडे, मिलिंद दामोदर, विवेक गवई उपाध्यक्ष जितेंद्र खंडारे सचिव, राहुल अहिर सचिव, रोशन धांडे , अतिश दामोदर, अजय खांडेकर, प्रफुल वरठे, विशाल गवई, शिरीष ओव्हाळ, रामा लाहुडकर, निशांत राठोड आदींसह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.