शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

अकोला-अमरावती मतदारसंघात अ.भा. मराठी नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:29 AM

अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २0१८-२0१३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी राज्यभर मतदान झाले. मात्र, अकोला - अमरावती संयुक्त विभागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने मतदान होऊ शकले नाही. रविवार, ४ मार्च रोजी अकोला येथे प्रभात किड्स स्कूल व अमरावती येथे टाउन हॅालमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, ऐनवेळी अमरावतीचे अँड.  प्रशांत देशपांडे यांनी माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ  शकली नाही.

ठळक मुद्देअखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक-२0१८

नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २0१८-२0१३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी राज्यभर मतदान झाले. मात्र, अकोला - अमरावती संयुक्त विभागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने मतदान होऊ शकले नाही. रविवार, ४ मार्च रोजी अकोला येथे प्रभात किड्स स्कूल व अमरावती येथे टाउन हॅालमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, ऐनवेळी अमरावतीचे अँड.  प्रशांत देशपांडे यांनी माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ  शकली नाही.अकोला जिल्हा मतदारसंघात अकोला शाखेचे अनिल कुळकर्णी, मलकापूर शाखेचे अशोक ढेरे आणि अमरावती शाखेचे अँड.  प्रशांत देशपांडे यांचे अर्ज दोन जागांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी अँड.  प्रशांत देशपांडे यांनी अर्ज माघारी घेण्याच्या निश्‍चित तारखेपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर निवडणुकीच्या आदल्या दिवशी मी निवडणूक लढू इच्छित नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांना कळविले. त्यामुळे अकोला-अमरावती विभागाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, असे आदेश पत्र मुंबईहून अकोल्यात धडकल्याने निवडणूक प्रक्रिया रविवारी होऊ शकली नाही. अमरावती शाखेतील २८0 व अकोला-मलकापूर शाखेतील ६१३ सदस्यांना निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली असल्याचे तातडीने कळविण्यात आले. अकोला-अमरावती विभागातील निवडणूक बिनविरोध जरी झाली असली, तरी तांत्रिकदृष्ट्या निवडणूक प्रक्रियेनुसार विजेत्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत. जर अँड.  देशपांडे यांनी २५ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेतला असता, तर त्याचवेळी निवडणुकीतील उर्वरित दोन उमेदवारांची नावे विजयी म्हणून घोषित करण्यात आली असती.अकोला शाखेचे अनिल कुळकर्णी व मलकापूर शाखेचे अशोक ढेरे यांच्या नावाची विजयी घोषणा अधिकृतरीत्या ७ मार्च रोजी होईल. निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर होणार असून, ज्यांना निवडणुकीबाबत लेखी तक्रार करायची असेल, त्यांच्यासाठी २0 मार्च ही मुदत देण्यात आली आहे. या लेखी तक्रारींचा निर्णय २५ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन करायचे असल्यामुळे अकोला नाट्यक्षेत्रात ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या मार्गदर्शनात लगबग पाहायला मिळाली होती. 

तांत्रिकदृष्ट्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. विजेत्यांची औपचारिक घोषणा ७ मार्चला होईल.- मधु जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी-

टॅग्स :AmravatiअमरावतीAkolaअकोला