अकोला जिल्ह्यातील भाजप इच्छुकांची ‘गडकरी वाड्या’वर हजेरी!

By Admin | Updated: August 25, 2014 03:14 IST2014-08-25T03:00:13+5:302014-08-25T03:14:16+5:30

भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील इच्छुकांनी दोन दिवस नागपूरमध्ये गडकरी वाड्यावर हजेरी लावल्याची माहिती.

Akkola district BJP seekers attend Gadkari wada! | अकोला जिल्ह्यातील भाजप इच्छुकांची ‘गडकरी वाड्या’वर हजेरी!

अकोला जिल्ह्यातील भाजप इच्छुकांची ‘गडकरी वाड्या’वर हजेरी!

अकोला- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह इच्छुकांनी सलग दोन दिवस नागपूरमध्ये गडकरी वाड्यावर हजेरी लावल्याची माहिती आहे. उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार्‍यांमध्ये एका विद्यमान आमदाराचाही समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोला पश्‍चिम या तिन्ही मतदारसंघात सध्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. मूर्तिजापूर आणि अकोला पश्‍चिम या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. बाळापूर मतदारसंघाच्या गत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र बाळापूरमधूनच इच्छूक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मूर्तिजापूर आणि अकोला पश्‍चिमचा क्रम लागतो. काही इच्छुकांनी तर अकोला पश्‍चिम किंवा बाळापूर या पैकी कोणताही एक मतदारसंघ मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला आहे. दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमांसाठी नागपूरमध्ये असल्याची संधी साधून अकोला जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी त्यांच्या वाड्यावर हजेरी लावली. तिकीट मिळावे म्हणून गडकरी यांना साकडे घालणार्‍यांमध्ये एका विद्यमान आमदाराचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांनी या दोन दिवसांमध्ये गडकरींची भेट घेऊन त्यांची उमेदवारी कशी सक्षम राहील, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Akkola district BJP seekers attend Gadkari wada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.