प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून

By Atul.jaiswal | Updated: May 11, 2024 20:27 IST2024-05-11T20:18:08+5:302024-05-11T20:27:15+5:30

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे

Ahmedabad-Khurda Road-Udhana Special Express via Akola from Wednesday, keeping in mind the rush of passengers | प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून

प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून

अतुल जयस्वाल, अकोला: उन्हाळ्यातील सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने अहमदाबाद ते खुर्दा रोड व सुरत ते खुर्दा रोड दरम्यान उन्हाळी विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९४२३ अहमदाबाद-खुर्दा रोड विशेष एक्स्प्रेस अहमदाबाद येथून दिनांक बुधवार १५ मे, शुक्रवार १७ मे, बुधवार २२ मे आणि बुधवार २९ मे रोजी १९.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.०० वाजता खुर्दा रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९४२४ खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस खुर्दा रोड येथून शुक्रवार १७ मे, रविवार १९ मे, शुक्रवार २४ मे आणि शुक्रवार ३१ मे रोजी १६.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीच्या अप व डाऊन प्रत्येकी चार अशा एकूण आठ फेऱ्या होणार असून, दोन्ही दिशांना नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, बांलगीर, हिराकुड, संबळपूर, रायराखोल, अंगुल, तलचेर, धेंकनाल आणि भुवनेश्वर येथे थांबे असतील. गाडी क्रमांक ०९४२३ ला वडोदरा, सुरत आणि उधना स्टेशनवर अतिरिक्त थांबे असतील.

सुरत-खुर्दा रोड-उधना विशेषच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०९०१९ सुरत-खुर्दा रोड विशेष एक्स्प्रेस सुरत येथून गुरुवार, १६ मे रोजी २३.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.०० वाजता खुर्दा रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०२० खुर्दा रोड-उधना विशेष खुर्दा रोड येथून शनिवारी, १८ मे रोजी १६.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीला नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, बांलगीर, हिराकुड, संबळपूर, रायराखोल, अंगुल, तलचेर, धेंकनाल आणि भुवनेश्वर येथे थांबा असणार आहे.

Web Title: Ahmedabad-Khurda Road-Udhana Special Express via Akola from Wednesday, keeping in mind the rush of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.