शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर, पातूर येथील शेतकऱ्यांसाठी आता अकाेल्यात कृषी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:31 IST

Agriculture office in Akola for farmers in Balapur, Patur : दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.

अकाेला: बाळापूरपातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेता राज्य शासनाने सदर दाेन्ही तालुके अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचे निर्देश शुक्रवारी जारी केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे उपराेक्त दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले असून त्याद्वारे कारभार केला जात आहे. दरम्यान, अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फतच तेल्हारा, अकाेटसह पातूरबाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कामकाज निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात हाेता. बाळापूर किंवा पातूर येथे कृषी अधिकारी कार्यालय असणे अपेक्षित असताना या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक समस्या किंवा याेजनांची माहिती घेण्यासाठी ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतराची पायपीट करावी लागत हाेती. त्यामुळे अकाेट येथील कृषी कार्यालयाचे बाळापूर किंवा पातूर येथे स्थानांतरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली हाेती. यासंदर्भात सेना आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़ शेतकऱ्यांची गैरसाेय पाहता कृषिमंत्र्यांनी बाळापूर व पातूर तालुका अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचा आदेश जारी केला. यासंदर्भात शासनाने शुक्रवारी निर्देश जारी केले.

 

शेतकऱ्यांना माेठा दिलासा

बाळापूर व पातूर येथील शेतकऱ्यांना चक्क अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत हाेते. प्रवासाचे अंतर लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवली हाेती. शासनाच्या निर्णयामुळे या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

 

बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयात जाणे अशक्य झाले हाेते. त्यामुळे त्यांना शासनाच्या अनेक याेजनांपासून वंचित राहावे लागत हाेते. यासंदर्भात कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला. यापुढे शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ घेता येणार आहे.

-आमदार नितीन देशमुख, शिवसेना

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरPaturपातूरFarmerशेतकरी