बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:52 AM2018-07-13T05:52:33+5:302018-07-13T05:52:56+5:30

कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतक-यांच्या काळजात धडकी भरली.

agriculture News | बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला - कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतकºयांच्या काळजात धडकी भरली. या ‘पतंग’चे बोंडअळीत रूपांतर होण्यापूर्वीच तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) न झाल्यास या वर्षीही कपाशीचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मागील वर्षी राज्यात ४२ लाख हेक्टर कपाशीची पेरणी झाली होती. पण गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने ४० टक्क्यांच्या वर कपाशीचे नुकसान झाले. विदर्भातील शेकडो शेतकºयांना उभ्या कपाशीवर नांगर फिरवावा लागला. त्यामुळे यंदा ३० ते ४० टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

बोंडअळ्यांचे पतंग कोषातून बाहेर पडले असून, त्यांचे खाद्य कपाशी हे एकमेव पीक आहे; पण पतंगातून बाहेर येणाºया अळ्या फुले, पात्याच्या अवस्थेतच कपाशीत शिरतात. एकदा का अळ्यांनी शिरकाव केला त्यानंतर मात्र कपाशीचे प्रचंड नुकसान होते. शेतकºयांनी मात्र शेताचे सर्वेक्षण करावे.
- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण, कीटकशास्त्र विभाग

Web Title: agriculture News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.