शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे जलस्रोत पडले कोरडे!

By admin | Updated: May 11, 2014 18:14 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे. सध्या विहिरींच्या पाण्यावर संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत. विहिरींची पातळी खोल गेल्याने संशोधन जगविण्यासाठी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे.
या कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकरच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक जमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्र आहेत. पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी - बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञाच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, कंेद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. या पाण्यावर कृषी विद्यापीठाच्या शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे, हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून ग्रॅव्हिटीने पाणी संशोधन प्रकल्पापर्यंत सोडले जायचे, पण अलीकडच्या काही वर्षात कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या क्षेत्रावर जेमतेम संशोधनाचे प्लॉट आहेत. तेलबिया संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर बोअरवेलच्या पाण्यावर भुईमूग संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत.
दरम्यान, कृषी विद्यापीठाला कायमचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम बीजोत्पादन, बियाणे उत्पादनावर होत आहे. आता ज्या काही क्षेत्रावर पेरणी केली आहे. या मे महिन्यात तगेल की नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरू पी पाणी मिळवून देण्याचे आव्हान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासमोर आहे.