शेतीच्या वादातून दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला
By Admin | Updated: April 25, 2017 01:38 IST2017-04-25T01:38:35+5:302017-04-25T01:38:35+5:30
तेल्हारा : शेतीच्या वादातून दोघांवर तिघांनी कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २४ एप्रिल रोजी तालुक्यातील वाडी अमदपूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला
तेल्हारा : शेतीच्या वादातून दोघांवर तिघांनी कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २४ एप्रिल रोजी तालुक्यातील वाडी अमदपूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वाडी अदमपूर येथील शेतकरी पर्वत पंढरी वाघ (५८) व पवन पर्वत वाघ हे २४ एप्रिलला शेतात गेले असता, येथील ज्ञानेश्वर रामराव वाघ, किशोर रामराव वाघ, बालू रामराव वाघ यांनी शेतीच्या धुऱ्यावरून वाद घातला. तसेच तिघांनी पर्वत वाघ व पवन वाघ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मयूर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर वाघ यास पोलिसांनी अटक केली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पर्वत वाघ, पवन वाघ यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय केदासे, हे.कॉ. खेकडे करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी भेट दिली.