शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

 अकोला मध्यवर्ती कारागृह परिसरातील सागवान वृक्षांची कत्तल करून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:34 PM

 अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले.

ठळक मुद्दे१२ एकर जमिनीवर पाच हजार सागवान वृक्ष डौलाने उभे आहेत, तर उर्वरित जमिनीवर शेती केली जाते. कारागृह प्रशासनाचे होत असलेले र्दुलक्ष पाहून, काही चोरटे याचा फायदा घेत आहेत आणि सागवान वृक्षांची कत्तल करून त्याचे लाकूड लांबवित आहेत. लास टेकडी, खदान परिसरातील काही लोक झाडांमधील बांबूसुद्धा तोडून नेत आहेत.

- नितीन गव्हाळे

 अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. परंतु, कारागृह प्रशासनाला याचा थांगपत्तादेखील नाही. कारागृहातील लाखो रुपयांची संपत्ती असलेले सागवान रातोरात चोरटे लांबवित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीची ५० एकर जमीन आहे. यापैकी १२ एकर जमिनीवर पाच हजार सागवान वृक्ष डौलाने उभे आहेत, तर उर्वरित जमिनीवर शेती केली जाते. कारागृह प्रशासनाने शेत जमिनीवर अतिक्रमण होऊ नये आणि कारागृहाला आर्थिक उत्पन्न मिळावे, या उद्देशाने शेत जमिनीवर १९९६ मध्ये पाच हजार सागवान वृक्षांची लागवड केली. आता ही सागवानांची झाडे २५ वर्षांची झाली आहेत. बाजारपेठेत सागवानाला मोठी मागणी असून, सागवानाचे लाकूडसुद्धा प्रचंड महाग आहे. कलाकुसरेच्या वस्तू, देवघर बनविण्यासाठी सागवान लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत कारागृह परिसरातील सागवानावर अनेकांची नजर आहे. कारागृह प्रशासनाचे १२ एकरावरील सागवान वृक्षांकडे होत असलेले र्दुलक्ष पाहून, काही चोरटे याचा फायदा घेत आहेत आणि सागवान वृक्षांची कत्तल करून त्याचे लाकूड लांबवित आहेत. बुधवारी ‘लोकमत’ने कारागृह परिसरातील सागवान वृक्षांची पाहणी केली असता, परिसरातील शेकडो वृक्ष बुध्यांपासून तोडलेले दिसून आले. वादळामुळे उन्मळून पडलेले वृक्ष तोडून मध्यरात्रीच्या सुमारास लांबविण्यात येत आहेत. यासोबत या परिसरात बांबूसुद्धा आहेत. कैलास टेकडी, खदान परिसरातील काही लोक झाडांमधील बांबूसुद्धा तोडून नेत आहेत. सागवान वृक्षांची कत्तल करून त्याची चोरी होत असतानाही कारागृह प्रशासन त्याबाबत गंभीर नाही. कारागृह परिसराला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक जण शेतीमध्ये गुरे, शेळ्या चरायला सोडतात. त्यामुळे शेतीचेसुद्धा नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)तरीही सागवानाची चोरी...कारागृहामध्ये शेकडो कैदी कारावासात आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलीस व कारागृह प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागते. एकंदरित सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृह परिसरात पोलिसांसोबतच कारागृह सुरक्षा रक्षकांनादेखील गस्त घालावी लागते. मध्यरात्रीदरम्यान ही गस्त असते. असे असतानाही कारागृह परिसरातील सागवान चोरीला जात आहे. यावरून गस्तीवरचे पोलीस आणि कारागृह सुरक्षा रक्षक किती गंभीर आहेत, हे दिसून येते.

कारागृह, शेती, सागवान वृक्षांच्या सुरक्षेसाठी गस्त पथक आहे. परंतु, कारागृह परिसराला सुरक्षा कुंपण नसल्यामुळे सागवान वृक्षांची कत्तल करून चोरी केली जात आहे. सुरक्षा कुंपणासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. शासनाने ७६ लाख रुपये दिले. परंतु, हा निधी कमी पडला. त्यामुळे पुढील कुंपणाचे काम थांबले आहे.- ज्ञानेश्वर जाधव, कारागृह अधीक्षक

 

टॅग्स :Akolaअकोलाjailतुरुंगforestजंगल