मराठा आरक्षणानंतर अकोला जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:31 IST2018-12-15T13:29:31+5:302018-12-15T13:31:17+5:30
अकोला : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणानंतर अकोला जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरु
अकोला : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शुक्रवार, १४ डिसेंबर रोजी अकोल्यातील मनीष सुळे यांना जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळाले.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गत महिन्यात मंजूर करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या राजपत्रातील सूचनेप्रमाणे मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये अकोल्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र १४ डिसेंबर रोजी मनीष संतोष सुळे यांना मिळाले. अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात मनीष सुळे यांच्यावतीने त्यांचे चुलतभाऊ भूषण सुळे यांना उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या हस्ते जातीचे मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर अकोला जिल्ह्यात पहिले मराठा जात प्रमाणपत्र मनीष सुळे यांना मिळाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजपत्राच्या सूचनेप्रमाणे मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र अकोल्याचे मनीष संतोष सुळे यांना देण्यात आले आहे. मानीव दिनांकापूर्वीचे (१९६०) जातीचे पुरावे असल्यास संबंधितांना विनाविलंब मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.
-डॉ. नीलेश अपार,
उपविभागीय अधिकारी, अकोला.
मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्यानंतर, माझा चुलतभाऊ मनीष संतोष सुळे यांच्यावतीने मराठा जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाºयांकडून मी स्वीकारले आहे. जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र स्वीकारताना मला अभिमान वाटला. शिक्षण, नोकरी व इतर महत्त्वाच्या कामांसाठी मराठा जात प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे.
-भूषण सुळे,
प्रमाणपत्रधारकाचे चुलतभाऊ.