पश्‍चिम व-हाडात १00 उमेदवारी अर्ज बाद

By Admin | Updated: September 30, 2014 01:04 IST2014-09-30T00:58:53+5:302014-09-30T01:04:02+5:30

अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील १00 उमेदवारी अर्ज बाद.

After the application for 100 nomination papers in West Wa-Bada | पश्‍चिम व-हाडात १00 उमेदवारी अर्ज बाद

पश्‍चिम व-हाडात १00 उमेदवारी अर्ज बाद

अकोला : पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यांमधील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे १00 अर्ज छाननी प्रक्रीयेमध्ये बाद करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये २१ उमेदवारांचे ३९ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. यात प्रामुख्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत डमी अर्ज सादर करणार्‍यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात आकोट, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांमध्ये १८५ उमेदवारांनी २५८ अर्ज सादर केले. त्यापैकी ३९ अर्ज बाद झाल्याने, आता १६४ उमेदवारांचे २१९ अर्ज शिल्लक आहेत. अकोला पूर्व मधून ४ उमेदवारांचे ५ अर्ज रद्द झालेत. अकोला पश्‍चिममध्ये ४ उमेदवारांचे ६, आकोटमध्ये २ उमेदवारांचे ४, बाळापूरमध्ये ७ उमेदवारांचे २0 आणि मूर्तिजापूरमध्ये ४ उमेदवारांचे ४ अर्ज बाद झाले. पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून, पक्षाचा एबी फॉर्म न जोडणार्‍या डमी उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय काही अपक्ष उमेदवारांचे अर्जही बाद झालेत.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ उमेदवारांचे ३५ उमेदवार अर्ज बाद करण्यात आले. वाशिम विधानसभा म तदारसंघात १0 उमेदवारांचे १0 अर्ज, रिसोड मतदारसंघातील ४ उमेदवारांचे ८ अर्ज तर कारंजा मतदारसंघातील ५ उमेदवारांनी दाखल केलेले १७ उमेदवारी अर्ज विविध त्रुटींमुळे बाद करण्यात आले. आता या जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये १0५ उमेदवारांचे १७0 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये २६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज विविध कारणामुळे रद्द करण्यात आले. इतर १६0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात १, चिखलीत ४, खामगावमध्ये ३, जळगाव जामोदमध्ये ५, मलकापूरमध्ये २, मेहकरमध्ये ११ अर्ज रद्द करण्यात आले. सिंदखेडराजा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

Web Title: After the application for 100 nomination papers in West Wa-Bada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.